समितीचे अधिकारी/ कर्मचारी, बाजार आवारातील व्यापारी, अडते, हमाल, मापाडी व इतर घटकांचे वैद्यकीय सेवेसाठी सदरच्या कक्ष कार्यरत असून. मुख्यालय येथे धान्य विभाग प्रमुख व उपशाखा येथे पर्यवेक्षक याच्या मार्फत या विभागाचे कामकाज पहिले जाते.
बाजार समितीची बाजार आवारातील साफसफाई, स्वच्छता गृहांची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी हंगामी कर्मचारी व धान्य विभाग प्रमुख यांच्या मार्फत हे कामकाज पहिले जाते.
बाजार समितीच्या विविध बाजार आवार व विभागांकरिता अत्यावश्यक असणारी छापील स्टेशनरी, कार्यालयीन लेखन साहित्य आणि स्टेशनरी, फर्निचर, संगणक, संगणकीय साहित्य व इलेक्ट्रीक साहित्य इत्यादी एकाच ठिकाणी खरेदी करुन साठवणुक करणे, अविक्रेय माल नोंद वहीत त्यांच्या नोंदी घेऊन खरेदीच्या कामात सुश्रुतता येण्याच्या दृष्टीने भांडार कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भांडार कक्षाचे कामकाज दोन कनिष्ठ लिपिक व एक सहाय्यक यांच्यामार्फत पार पडले जाते.
बाजार समितीची बाजार आवारातील साफसफाई, स्वच्छता गृहांची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी समितीचे पर्यवेक्षक व कनिष्ठ लिपिक तसेच सहाय्यक यांच्या मदतीने हे व्यवस्थापन पार पाडले जाते.
