मुख्य बाजार आवार, सिंदी

बाजार समितीने सर्व प्रकारची धान्य, सोयाबीन, चना, कापूस, तुर, ज्वारी व गुरेढोरे इतर वस्तु बाजार नियंत्रणाखाली घेतलेले असुन, मुख्य बाजार सिंदी (रेल्वे), येथे स्वतःच्या मालकीचे जागेवर असुन, बाजार व मुख्यालयाकरीता ०.६० हे. आर. मुख्य यार्ड स्वतःचे मालकीचे जागेवर कार्यरत आहे. येथे धान्य बाजार, गुरांचा बाजार, तसेच शेतकऱ्यांच्या हिताकरीता तारण योजना राबवीत असून शेतमाल साठवणूकी करीता ४०० मे. टन व ६०० मे. टन गोडावून बांधलेले आहे.तसेच शेतकरी निवास असून, शेतकऱ्यांनी राहण्याची सुध्दा व्यवस्था करण्यांत आलेली आहे. समितीने शेतमालाची खुल्या लिलाव पध्दतीने विक्री, शेतमालाची साठवणूक, योग्य मोजमाप चुकाऱ्याची त्वरीत रक्कम देण्याची व्यवस्था हयावर नियंत्रण ठेवुन शेतकन्यांचे जास्तीत जास्त हित साधण्याचा प्रयत्न समिती करीत असुन, यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.बाजार समितीचे १९९१-९२ पासुन शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केलेली असुन समितीने सोयाबिन,चना, तुर ही शेतमाल तारण योजना राबवित आहे. दरवर्षी या योजनेमुळे शेतकऱ्यांना वाढीव भावाचा फायदा होत असल्यांचे दिसुन येते, याकरीता बाजार समितीने सिंदी (रेल्वे) सोबतच सेलू येथे शेतमाल साठवणुकी करीता गोडावुनची निर्मीती केलेली आहे, बाजार समितीने ठेवलेल्या रेकॉर्ड नूसार निरनिराळया प्रकारचे धान्य, कापूस व जनावर यांची सर्व प्रकारचे मार्केट फी चे माध्यमातुन सन २०२१-२२मध्ये रु.३,८१,९६,११०/- एवढे उत्पन्न झालेले असुन यावर अधिकारी, कर्मचारी तसेच रोजंदारी कर्मचारी वेतनावर खर्च रु. १,१५,५७,९९५/-झालेला आहे.